दारात फटाके उडवल्याच्या कारणातून कोल्हापूर जिल्ह्यात तरूणाचा खून

Rahul Shiudkar
Rahul Shiudkar

इचलकरंजी - दारात फटाके उडवल्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास इचलकरंजी जवळ यड्राव ( ता. शिरोळ ) येथे घडली. राहुल तुलसीदास शिवूडकर (२४,  रा. रेणुकानगर, यड्राव)  असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एकाच कुटूंबातील तिघांवर शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

अविनाश नर्लेकर, चंद्रकांत नर्लेकर, सचिन नर्लेकर ( सर्वजण राहणार रेणुका नगर, यड्राव) अशी संशयितांची नावे आहेत.
यड्राव परिसरात गेल्या आठ दिवसातील ही खुनाची दुसरी घटना आहे. 

दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलसानी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मृत राहुल याचा भाऊ अमोल तुळशीदास शिवूडकर (वय ३४) यांने पोलिसात तक्रार दिली आहे.

संशयित व मृत राहुल यांच्यात दसऱ्याच्यावेळी मंडळाचे साऊंड सिस्टिम साहित्य मागण्यावरून वादावादी झाली होती. त्यावेळेपासून त्यांच्यामध्ये वाद धुमसत होता. गुरुवारी संकष्टीनिमित्त गल्लीमध्ये सार्वजनिक आरतीचा कार्यक्रम होता. तो झाल्यानंतर फटाके फोडण्यात आले. हे फटाके नर्लेकर यांच्या घरासमोर लावण्यात आल्याने वाद उफाळला. यावेळी संशयित व लाड्या मिरजकर यांच्यामध्ये वाद झाला.

यावेळी संशयीत अविनाश यांने राहुलच्या गळ्यावर चाकूने वार केला. राहुल खाली कोसळला. त्यानंतर चंद्रकांत यांने अविनाश याच्याकडील चाकू घेऊन राहुलच्या डाव्या बरकडीवर भोकसला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेत राहुल गंभीर जखमी झाल्याने इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी आयजीएम रुग्णालयात करण्यात आली. मृत राहुल हा ऑटोलूम कारखान्यात मेंडिंग काम करीत होता.

खूनाची दुसरी घटना

कांही दिवसांपूर्वी यड्राव परिसरात अनिल मासाळ याचा खून झाला होता. त्यानंतर पुन्हा खुनाची घटना घडल्याने यड्राव परिसर हादरला आहे. अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.एन. पाटील  करीत आहेत..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com