Sangli Crime News I व्हरांड्याच्या छताला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, कुपवाडच्या शाळेतील धक्कादायक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Deshmukh

व्हरांड्याच्या छताला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

कुपवाड - येथील शाळेच्या व्हरांड्यातील छताला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. रवी रमेश देशमुख (वय 23 रा. समता कॉलनी कुपवाड) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, संबधित युवक कुपवाडच्या समता कॉलनीतील रहिवासी आहे. त्याने मुख्य चौकातील असणाऱ्या जि.प शाळा इमारतीच्या व्हरांड्यातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. 'आयुष' हेल्पलाईन टीमच्या मदतकार्याने मृतदेह उतरवून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याबाबतचा अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

Web Title: Youth Sucide In Kupvad School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top