Sangli : जिल्हा परिषदेकडे ११ हजार प्रवेश: पाडव्याचा मुहूर्त; पात्रपैकी ५४.३४ टक्के जि. प. शाळांत
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पाल्यांना शाळेत दाखल करण्याची परंपरा आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढवण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली होती. ‘गुढी पाडवा पट वाढवा’ असे अभियान राबविण्यात आले.
Zilla Parishad approves 11,000 admissions for the new academic year, with 54.34% students eligible, marking a significant step in rural education.Sakal
सांगली : ‘गुढी पाडवा पट वाढवा’ अभियानांतर्गत आज गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेच्या शाळेत ११ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ही संख्या दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५४.३४ टक्के आहे.