'ही' फुले आहेत पर्यावरणाला घातक; वनस्पतिशास्त्रातील तज्ज्ञांचे मत (व्हिडिओ)

Zinnia Peruviana flowers are dangerous for environment
Zinnia Peruviana flowers are dangerous for environment

नगर : पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेला फुलणारी केशरी रंगाची "झिन्निआ पेरुविना'ची फुले आकर्षक दिसत असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही फुले घातक असल्याचे वनस्पतिशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

ही विदेशी फुले स्थानिक मोसमी वनस्पती आणि गवत यांना वाढू देत नाहीत. त्यामुळे झपाट्याने फोफावणाऱ्या या वनस्पतीला वेळीच रोखणे आवश्‍यक आहे. अशा वनस्पती नगर शहरातील किल्ला मैदान, भिंगार रस्ता, गोविंदपुरा रस्ता आदी भागांत दिसून येत आहेत.

"झिन्निआ पेरुविना' हे या फुलांच्या झाडाचे शास्त्रीय नाव आहे. हे फूल "कॉसमॉस सल्फ्युरियस'सारखे दिसते. या फुलाला मॅक्‍सिकन सूर्यफूल, रानकराल, नगर शहरात या फुलांच्या प्रसाराबाबत वनस्पतितज्ज्ञांत एकमत नाही. काहींच्या मते, भुईकोट किल्ल्याच्या खंदकाचे काम करताना जमिनीत खोलवर राहिलेल्या या वनस्पतीच्या बिया जमिनीवर आल्याने ही झाडे वाढली आहेत.


काहींच्या मते मात्र, बियांच्या प्रसाराने नगर शहरात ती आली आहेत. जवळपास सहा फुटांपेक्षाही जास्त वाढू शकणारी ही वनस्पती आहे. येथील हवामान आणि जमीन तिला फारच मानवली आहे. या वनस्पतींना कीड लागत नाही आणि जनावरे तोंड लावत नाहीत. त्यामुळे त्या फोफावल्या. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला असलेले गवत, रानफुले, वनस्पती यांच्यासह गाजरगवतही वाढू देत नाही.

पावसाळ्यानंतर वाळून गेल्यावर "झिन्निआ पेरुविना'च्या बिया वाऱ्याने इतरत्र, तर गुरांकडून गवताळ कुरणांवर पसरतात. वाहनांच्या टायरमध्ये अडकून त्या खूप लांबवर पोचतात. त्यामुळेच ही वनस्पती रस्त्याकडेला दर वर्षी पुढेपुढे जात आहे.

पिकांसाठी घातक फुले
कमरेइतकी उंच असणारी ही वनस्पती पिकांसाठी घातक आहे. सोनकी-तेरड्यासारख्या मोसमी वनस्पती आणि गवत यांना वाढू न देणाऱ्या या आक्रमक "झिन्निआ पेरुविना'ला थोपविणे आवश्‍यक झाले आहे. कास पठारासारख्या जागी, जिथे हजारो वाहने जातात, तिथे ही वनस्पती पोचण्यापूर्वीच काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात फुले येण्यापूर्वी उगवलेली झाडे उपटणे, हाच एकमेव उपाय आहे.

झिन्निआ पेरुविना' या वनस्पतीला मराठीतून "रानकरालं' असेही म्हणतात. ही विदेशी प्रजात असून, देशी वनस्पतींसाठी ती घातक आहे. देशी वनस्पतींची जैवविविधता टिकण्यासाठी "रानकराल' नष्ट करणे आवश्‍यक आहे. - जयराम सातपुते, संस्थापक अध्यक्ष, जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र, नगर.

या वनस्पती भुईकोट किल्ला व त्याच्या भोवतीच्या परिसरात वाढल्या आहेत. ही गवत फुले असून, लुप्त होत चालली प्रजाती आहे. फुलांचे आयुष्य केवळ तीन दिवसांचे असले, तरी त्या वनस्पती इतर वनस्पतींना घातक आहेत.- डॉ. फहीम सय्यद, वनस्पतितज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com