

Zolambi Tourism Demand Grows In Sangli Nature Lovers Seek Opening During Flowering Season And Government Approval
sakal
सांगली: सह्याद्रीत रुळलेले वाघ ही जशी संपत्ती आहे, तशीच चांदोली परिसराची निसर्गसंपत्ती; म्हणजे झोळंबीचं पठार आणि त्यावर फुलणारा फुलांचा ताटवा. सध्या या पठारावर फुले बहरू लागली आहेत, मात्र हे क्षेत्र संरक्षित असल्याने तिथं जाणं शक्य नाही. किमान फुलोऱ्याच्या काळात तरी हे पठार खुलं व्हावं, अशी निसर्गप्रेमींची अपेक्षा आहे. आमदार सत्यजित देशमुख यांनीदेखील तशी मागणी करणारा प्रस्ताव दाखल केला आहे.