खातेप्रमुखांची मंगळवारी आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत दर सोमवारी होणारी खातेप्रमुखांची बैठक आता दर मंगळवारी घेण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी होणाऱ्या खातेप्रमुखांच्या बैठकीने नागरिकांच्या कामाचा होणारा खोळंबा, याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. २१) प्रसिद्ध केले होते. 

याची दखल घेऊन खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीचा दिवस बदलला आहे. याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी मंगळवारी केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दर सोमवारी खातेप्रमुखांची बैठक घेण्याची प्रथा सुरू केली. मात्र, आठवड्याचा पहिला दिवस असल्याने लोकांचीही कामे मार्गी लागतील, या अपेक्षेने सोमवारी येतात. या दिवशी सर्वच अधिकारी भेटतात, अशी त्यांची धारणा आहे. मात्र, अधिकारी सोमवारी आढावा बैठकीच्या तयारीत आणि बैठकीतच व्यस्त असतात. त्यामुळे लोकांना ताटकळत उभे राहावे लागते. सोमवारीही (ता. २०) नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. पहिलीच बैठक असल्याने अधिकाऱ्यांनीही तयारी केली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अधिकारी भेटत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला होता.

Web Title: Zp department chief meeting