राहायला शहरांत, लढणार गावांतून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामीण भागात; पण प्रत्यक्ष रिंगणात उतरलेले बहुतांश उमेदवार हे कोल्हापूर शहरातच राहायला आहेत. ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत गावगडी अपवादानेच दिसत आहे. शहरातील संस्कृती, सामाजिक परिस्थितीशी एकरूप झालेलेच उमेदवार रिंगणात दिसत आहेत. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामीण भागात; पण प्रत्यक्ष रिंगणात उतरलेले बहुतांश उमेदवार हे कोल्हापूर शहरातच राहायला आहेत. ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीत गावगडी अपवादानेच दिसत आहे. शहरातील संस्कृती, सामाजिक परिस्थितीशी एकरूप झालेलेच उमेदवार रिंगणात दिसत आहेत. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर सर्वच पक्षांतील बहुंताशी उमेदवार हे कोल्हापुरातच राहतात. अनेकांची नावे यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात होती; पण जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपली नावे आपल्या मूळ गावात नोंदवली. काहींची नावे पूर्वीपासूनच आपल्या मूळ गावांत आहेत. 

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल हे राहायला शहराच्या राजारामपुरी भागात आहेत; पण निवडणूक मात्र परिते गटातून लढवत आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांचे सख्खे भाऊ अजित व चुलतभाऊ संदीप राहतात शिवाजी पेठेत; पण आज दोघेही अनुक्रमे कोतोली व कळे गटातून रिंगणात आहेत. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचा बंगला रुईकर कॉलनीत; पण त्यांचे पुत्र वीरेंद्र बोरवडे गटातून नशीब अजमावत आहेत. राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचेही वास्तव्य ताराबाई पार्कातच; पण त्यांचे पुत्र रणवीर शाहूवाडी तालुक्‍यातून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या स्नुषा व विद्यमान सदस्य धैर्यशील माने यांच्या पत्नी रुकडी गटातून रिंगणात आहेत. या घराण्याचे हे मूळ गाव रुकडी; पण सध्या वास्तव्य रुईकर कॉलनीतील आलिशान बंगल्यात आहे. 

शहरात राहून गावाकडची निवडणूक लढवणाऱ्यांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. 

याशिवाय अनेक जण शहरात राहून गावात नशीब अजमावत आहेत. त्यात शिवसेनेचे उमेदवार संग्राम कुपेकर, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा सौ. स्वरूपाराणी, अपक्ष उमेदवार भूषण पाटील, भाजपचे तिसंगी गटातील उमेदवार पी. जी. शिंदे, कागलमधील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता घाटगे यांच्या स्नुषा उज्ज्वला या तर पुणे येथे वास्तव्याला आहेत; पण त्या शिवसेनेच्या तिकिटावर सेनापती कापशी गटाच्या उमेदवार आहेत.

Web Title: zp election kohapur