महाडिक गट, विषय कट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

कोल्हापूर - बरोबर पाच वर्षांपूर्वी २१ मार्च २०१२ ला आमदार सतेज पाटील यांनी सत्तेची चक्रे फिरवत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्यापासून रोखले. महाडिक विरुद्ध पाटील गटाच्या राजकीय ईर्ष्येतून अमल यांचा पत्ता कट केला. परंतु आज पाच वर्षांनी महाडिक गटाने आमदार अमल महाडिक यांची पत्नी शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदी विराजमान करून त्याचे उट्टे काढले. ‘महाडिक गट, विषय कट’ हे महाडिक गटाने यातून दाखवून दिले. 

आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय द्वेष, ईर्ष्या आणि चुरस प्रचंड आहे. गतवेळी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता होती. त्याचे नेतृत्व आमदार सतेज पाटीलच करत होते. त्या वेळी त्यांच्याकडे गृह राज्यमंत्री पदाचा कार्यभार होता. त्या वेळी राज्यातही काँग्रेसची सत्ता होती. महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक त्या वेळी काँग्रेसचे सदस्य होते. २०१२ ला अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्यावर आमदार सतेज पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे अशा सगळ्यांची मोट बांधून प्रा. संजय मंडलिक यांना अध्यक्षपदी विराजमान केले आणि अमल महाडिक यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवले. तेव्हापासून पाटील व महाडिक यांच्यामध्ये राजकीय वैर अधिकच वाढत गेले. 

महाडिकांना रोखण्यासाठी आमदार पाटील आणि आमदार पाटील यांना रोखण्यासाठी महाडिक, असे समीकरणच तयार झाले. या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही आमदार पाटील यांनी महाडिक यांना रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माजी आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील सख्य माहीत असूनही ते केवळ महाडिकांना रोखण्यासाठी रिंगणात उतरले होते.  

पद्धतशीरपणे राजकीय खेळी 
महाडिक यांनी या वेळी अत्यंत पद्धतशीरपणे राजकीय खेळी खेळली. आपल्याच मुलाकडे ताराराणी आघाडीची सूत्रे देत ३ सदस्य निवडून आणले. गडहिंग्लजमध्ये बाभूळकरांच्या दोन सदस्यांना निवडून आणले. याशिवाय आवाडे, शेट्टी यांनाही बरोबर घेतले. पालकमंत्र्‍यांबरोबर सगळ्यांची मोट बांधत बरोबर पाच वर्षांनी २१ मार्च २०१७ ला महादेवराव महाडिक यांनी शौमिका यांना अध्यक्ष करून राजकीय उट्टे काढले.

Web Title: zp election result