अर्थ व्यवहार राहिले ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

कोल्हापूर - विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे जिल्हा परिषदेतील आर्थिक बाबीशी संबंधित असलेली कामे आज ठप्प राहिली. कर्मचाऱ्यांतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, यामध्ये जिल्ह्यातील दीडशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

कोल्हापूर - विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे जिल्हा परिषदेतील आर्थिक बाबीशी संबंधित असलेली कामे आज ठप्प राहिली. कर्मचाऱ्यांतर्फे आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, यामध्ये जिल्ह्यातील दीडशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

जिल्हा सेवा वर्ग-3 लेखा श्रेणी-1 मध्ये असलेले पद सहायक लेखा अधिकाऱ्यांना राजपत्रित दर्जा मिळावा, ग्रेड पे मिळावा, महाराष्ट्र रोजगार हमी योजना व इंदिरा आवास योजनेंतर्गत पंचायत समितीवर सहायक लेखा अधिकारी पद निर्माण करावे, लेखा लिपिक परीक्षा, उपलेखापाल परीक्षा व लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वित्त व लेखा (जिल्हा परिषद) सेवा वर्ग-3ची परीक्षा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे स्पर्धा परीक्षा जाहीर करावी, सहायक लेखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे, पंचायत समिती स्तरावर कोषागार कार्यालयाप्रमाणे लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गट स्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार द्यावे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग-3च्या परीक्षा दरवर्षी घ्याव्यात, जिल्हा परिषद अंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट तयार करावे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग 2चे पद निर्माण करावे, आदी मागण्यांसाठी राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेतर्फे 10 मार्चपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम केले. शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आजपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. कामावर हजर राहून हे आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या दारात मंडप घातला आहे. या वेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. 

आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल माळवे, उपाध्यक्ष वैशाली पवार, बी. डी. पाटील, सचिव अशोक पाटील, कोषाध्यक्ष संतोष ओतारी, विजय देसाई, वसंत गाडे, महावीर सोळांकुरे, सुधाकर कांबळे, धनाजी जाधव आदी सहभागी झाले आहेत. 

दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी पाठिंबा दिला आहे. 

Web Title: ZP employee strike