झेडपी मैदानावर होणार वॉकिंग ट्रॅक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या येथील मैदानावर दररोज सकाळी शेकडो लोक व्यायाम करण्यासाठी चालत असतात. तसेच अनेक खेळाडू येथे सरावही करतात. चालणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने मैदानावर पादचारी मार्ग (वॉकिंग ट्रक) उभारण्याचे काम सुरू केले आहे. यासह इतर कामांसाठी जिल्हा परिषदेने दहा लाखांच्या निधीची तरतूद केली आहे.

जिल्हा परिषदेचे है मैदान सातारा शहरातील प्रमुख मैदानांपैकी एक असून, येथे विविध प्रदर्शने आयोजित होत असतात. तद्वत मोठमोठ्या सभाही होतात. त्याचबरोबर सकाळ, संध्याकाळी व्यायामासाठी फिरणाऱ्यांची संख्या शेकड्यांत आहे. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर येथील माती वाहून धूपही मोठ्या प्रमाणात होत असते. या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी मैदानावर पाथ वे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सात लाख, तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तीन लाखांची तरतूद केली आहे. यामुळे पादचाऱ्यांना व्यायामासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. सुमारे ४०० मीटरचा हा मार्ग तयार होत आहे. माती, खडी, काँक्रिट, ग्रीड, मुरूम, वीट आदी साहित्यांचा वापर करून हा मार्ग बनविला जात आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी दिली.

स्वच्छतागृहांचीही उभारणी
दरम्यान, मैदानावर महिला व पुरुषांसाठी ड्रेस चेंजिंग रूम, स्वच्छतागृहाचीही उभारणी केली जाणार आहे. 

Web Title: ZP Ground Walking Track