सदस्यांच्या स्वागताला नटू लागली ‘झेडपी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. त्याचवेळी पुढील पाच वर्षे ज्या इमारतीच्या साक्षीने नवीन सदस्य जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत, ती इमारत त्यांच्या स्वागतासाठी नटू लागली आहे. 

दरम्यान, इमारतीची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली असून, दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. इमारतीची रंगरंगोटी, सर्व जिन्यांची स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती आणि अपंगांसाठीच्या निधीतून स्वच्छतागृहांची कामे सध्या सुरू आहेत.

विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर लागलेली आचारसंहिता आणि त्यानंतर सुरू झालेली रणधुमाळी या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आवारात वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे हिच संधी साधून ही कामे सुरू झाली आहेत. येत्या १५ दिवसांत ही सर्व कामे पूर्ण करून घेतली जाणार आहेत.

Web Title: zp kolhapur