झेडपीच्या गाळ्यांचे २२ कोटींचे बजेट

ZP-Satara
ZP-Satara

सातारा - जिल्हा परिषदेने स्वत:च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी येथील अध्यक्ष निवासस्थानालगतच्या मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्याचा निर्णय फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय सभेत घेतला होता. त्यानुसार आता हलचाली गतिमान झाल्या असूृन, तब्बल २२ कोटींचा आराखडा बनविला आहे. त्यातून २१० गाळे उभारले जाणार असून, पुढील सर्वसाधारण सभेत तो प्रशासकीय मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्‍यता आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या जागा सातारा, कऱ्हाड शहरासह जिल्हाभरात मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. साताऱ्यात पोवई नाका, विसावा नाका, राधिका रस्त्यावरील काही जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. तसेच जिल्ह्यातील जागांचा व्यावसायिक वापर केल्यास त्यातून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. याबाबत काही माजी पदाधिकाऱ्यांनी आराखडेही बनविले होते. परंतु, त्याला मूर्तस्वरूप आले नाही. शिवाय, अनेक वर्षांपासून या जागांचा विकास व्हावा, अशी मागणीही सभागृहात होत असते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढीसाठी पावले उचलली आहेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत अध्यक्ष निवासस्थान असलेल्या मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

त्यानंतर आर्किटेक्‍टमार्फत त्याचा आराखडा बनवला आहे. सुमारे २२ कोटींचा आराखडा बनविला आहे. त्यातून २१० गाळे उभारले जाणार आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी हा आराखडा पुढील सर्वसाधारण सभेत मांडला जाण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेचा सेस फंड, तसेच उभारल्या जाणाऱ्या गाळ्यांसाठी अनामत रक्‍कम घेऊन त्यातून ही इमारत उभारली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागातून प्राप्त झाली. ही इमारत पूर्णत्वास गेल्यास त्यातून जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी उपाध्यक्षांच्या अध्यक्षेतखाली समिती तयार करणे विचाराधीन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com