सांगली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अडवला सदस्यांचा रस्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सांगली - जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला आहे.
कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज होती. या सभेसाठी येणाऱ्या सदस्यांचा रस्ता कर्मचाऱ्यांनी आडवला. 

सांगली - जुनी पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला आहे.
कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज होती. या सभेसाठी येणाऱ्या सदस्यांचा रस्ता कर्मचाऱ्यांनी आडवला. 

एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही सभा पुन्हा आचारसंहितेच्या आधी घेण्यासाठी हालचाली कराव्या लागणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, अधिकाऱ्यांच्या संघटना यासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ही आज संप पुकारला आहे. सुमारे ३५ संघटनांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. 

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या - 

 • जुनी पेंशन योजना लागू करावी.
 • सर्व संवर्गातील वेतनत्रूटी दूर कराव्या.
 • कंत्राटी धोरण बंद करुन रिक्त पदे तात्काळ भरणे.
 • केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत.
 • अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी.
 • केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे.
 • राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी.
 • शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्यात यावा
 • आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करावे.
 • सर्व कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी.
 • शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये.
 • आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमॅट्रीक प्रणाली आणू नये

दोन दिवसांत या मागण्यांवर निर्णय झाला नाही तर ११ सप्टेंबर पासून बेमुदत संप करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP workers agitation in Sangli