महत्वाची बातमी : पुण्यातील कुठली दूध केंद्रे बंद झाली पाहा... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील मध्यवर्ती पेठांमध्ये दूध खरेदीला गर्दी होत असल्याने शासकीय दूध योजना कार्यालयाला 7 ते 8 आरे दूध केंद्रे बंद ठेवावी लागत आहे.

पिंपरी ः पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील मध्यवर्ती पेठांमध्ये दूध खरेदीला गर्दी होत असल्याने शासकीय दूध योजना कार्यालयाला 7 ते 8 आरे दूध केंद्रे बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे, अगोदरच आर्थिक नुकसानीमध्ये असलेल्या आरे दूधाचा खप 1200 लिटर्स प्रतिदिन इतका कमी झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासकीय दूध योजनेव्दारे, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे, खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात आरे दूधाचे वितरण केले जाते. राज्यात टाळेबंदी लागू होण्यापूर्वी वरील परिसरात आरे दूधाचा खप साडेनऊ ते दहा हजार लिटर्स प्रतिदिन इतका होता. मात्र, त्यानंतर, निरनिराळ्या कारणांमुळे आरे दूधाचा खप कमी झाला आहे. 

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

शासकीय दूध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक डी. पी. बनसोडे म्हणाले,""पुण्यातील कसबा पेठ, शनिवारवाडा, लालमहाल, रास्ता पेठ आदी भाग हे प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. या भागांतील पूर्वी 7 ते 8 दूध विक्री केंद्रे चालू होती. मात्र, तेथे गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी ही केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे, तेथील दूध वितरण बंद आहे.'' 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह लगतच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात आरेची जवळपास 125 दूध विक्री केंद्रे असून, शासकीय दूध योजनेतील वीज यंत्रणेतील बिघाडामुळे दूध संकलन, पॅकिंग आणि वितरण ठप्प होण्यापूर्वी आरे दूधाचा खप प्रतिदिन 6 हजार 500 रुपये प्रतिलिटर इतका राहिला आहे.

 आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 Aarey milk centers in Pune closed