esakal | आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter war between Aditya Thackeray and Pune MLA Siddharth Shirole

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हॉंगकॉंग, लंडन, सिंगापूर, कुवेत, बांगलादेश, अफ्रिका, अमेरिका, फिलिपाईन्स, अफगनिस्तान, इराण आदी विविध देशांत भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यांना देशात परतायचे आहे. परंतु, त्यासाठीची प्रक्रिया त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. केंद्र सरकारने ऑपरेशन वंदेमातरम सुरू केले आहे. परंतु, जे भारतीय परदेशात आहेत त्यांनी तेथून येथील लोकप्रतिनिधींना व्टिटरद्वारे टॅग करून मदत करा, अशी मागणी करण्यास प्रारंभ केला आहे.

आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यावरून शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची ट्विटरवर सध्या चांगलीच जुंपली आहे. भाजपची ट्रोल आर्मी ते महाविकास आघाडीतील गोंधळ आदी अनेक मुद्दे या निमित्ताने दोघांच्या चर्चेत आले
अन राष्ट्रीय प्रश्नावरून हा वाद अखेर वैयक्तिक पातळीवर पोचला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

स्ट्रेलिया, न्यूझीलंड, हॉंगकॉंग, लंडन, सिंगापूर, कुवेत, बांगलादेश, अफ्रिका, अमेरिका, फिलिपाईन्स, अफगनिस्तान, इराण आदी विविध देशांत भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यांना देशात परतायचे आहे. परंतु, त्यासाठीची प्रक्रिया त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही. केंद्र सरकारने ऑपरेशन वंदेमातरम सुरू केले आहे. परंतु, जे भारतीय परदेशात आहेत त्यांनी तेथून येथील लोकप्रतिनिधींना व्टिटरद्वारे टॅग करून मदत करा, अशी मागणी करण्यास प्रारंभ केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

अशाच एका टॅगमुळे सिद्धार्थ शिरोळे यांनी, 'राज्य सरकारकडून परवानगी मिळत नसल्यामुळे काही विमाने मुंबईत लॅंन्ड होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रीयन नागरिकांची गैरसोय होत आहे',असे म्हटले होते. तसेच 'या बाबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये इतका गोंधळ सुरू आहे की, उजव्या हाताला कळत नाही की, डावा हात काय करीत आहे. तसेच मंत्रिमंडळाचे काही विभाग तर मुख्मंत्र्यांच्या नियंत्रणापालिकडे गेले आहेत, सरकारला नेतृत्त्वाचा अभाव आहे', अशी टिप्पण्णी शिरोळे यांनी केली.

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

शिरोळे यांच्या टिपण्णीला प्रत्यूत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी, `तुम्ही तरुण आहात...त्यामुळे जरा वेगळे असाल असे वाटत होते. तुम्ही तुमच्या ट्रोल आर्मीसारखे नसाल, अशी अपेक्षा होती. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. त्यांच्याकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात तुम्ही ब्लेम गेम खेळू नका, राज्य सरकार चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. हे मुद्दे काही राजकारणाचा विषय नाही, हे तुम्ही समजून घ्यायला हवे होते, असा टोला ठाकरे यांना शिरोळे यांना लगावला. तसेच पहिल्या टप्प्यात 12 विमानांमधून 1956 नागरिक मुंबईत परतले आहेत, आणखी 14 विमानांचे नियोजन केंद्र सरकार बरोबर सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

ठाकरे-शिरोळे यांच्या परस्परांच्या उत्तर-प्रत्यूत्तरावर भरपूर नेट्रिझन्सनी लाईक, कॉमेंटस करून आपलाही सहभाग नोंदविला असून त्यातून वेगवेगळे विषय पुढे येत असल्याचे त्या थ्रेडवरून दिसून आले.

loading image
go to top