
आजपर्यंत शहरातील एक हजार 778 व बाहेरील 743 रुग्णांचा मृत्यू झाला. इंग्लंडहून आलेले व पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन जणांचे 14 दिवसांनंतरच्या तपासणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
पिंपरी - शहरात मंगळवारी 119 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 98 हजार 185 झाली आहे. आज 220 जणांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 हजार 900 झाली आहे. सध्या एक हजार 507 सक्रिय रुग्ण आहेत.
सुप्रिया सुळे म्हणतात, 'पुण्याचा महापौर आता राष्ट्रवादीचाच'
आज शहरातील चार व बाहेरील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 778 व बाहेरील 743 रुग्णांचा मृत्यू झाला. इंग्लंडहून आलेले व पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन जणांचे 14 दिवसांनंतरच्या तपासणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या महापालिका रुग्णालयांत 601 रुग्ण उपचार घेत आहेत. 906 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 794 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. 875 जणांचे विलगीकरण केले.