मावळात काल दिवसभरात १२३ पॉझिटिव्ह; तळेगावने ओलांडला हजाराचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

बुधवारी दिवसभरात नव्याने १२३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ३ हजार २९१ झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १०७ जणांचा मृत्यू  झाला आहे तर २ हजार ३०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात रुग्ण संख्येने पुन्हा उचल खाल्ली असून तळेगाव दाभाडे येथील संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

खासदार बारणेंनी लोकसभेत उठवला आवाज; केंद्र सरकारकडे केल्या 'या' दोन मागण्या

बुधवारी दिवसभरात नव्याने १२३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ३ हजार २९१ झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १०७ जणांचा मृत्यू  झाला आहे तर २ हजार ३०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १२३ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ४०, लोणावळा येथील ३५, कामशेत येथील सहा,  तळेगाव दाभाडे ग्रामीण, इंदोरी, भोयरे व वरसोली येथील प्रत्येकी चार, कडधे, कुसगाव बुद्रुक, सोमाटणे व कान्हे येथील प्रत्येकी तीन,  टाकवे बुद्रुक व वराळे येथील प्रत्येकी दोन तर कुरवंडे, निगडे, शिरगाव, ब्राम्हणवाडी, नवलाख उंब्रे, वडेश्वर, साळूंब्रे, बेबडओहळ, येळसे व कार्ला येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

थुंकीबहाद्दरांना आता भरावा लागणार एक हजार रुपये दंड!

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार २९१ झाली असून त्यात शहरी भागातील १ हजार ८९९ तर ग्रामीण भागातील १ हजार ३९२ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार ३२, लोणावळा येथे ६५३ तर वडगाव येथे रुग्णसंख्या २१४ एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला आहे तर २ हजार ३०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी १०९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ८७६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ५१६ जण लक्षणे असलेले तर ३६० जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५१६ जणांपैकी ३६३ जणांमध्ये सौम्य तर १४५ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. आठ जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ८७६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 123 positive in maval and Talegaon crossed the thousand corona patients