थुंकीबहाद्दरांना आता भरावा लागणार एक हजार रुपये दंड!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या सर्वच प्रकारच्या थुंकीबहाद्दरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे.

पिंपरी : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. अशा व्यक्तींकडून दीडशे रुपये दंडाची आकारणी केली जात आहे. तरीही नागरिक ऐकत नसल्याने दंडाची रक्कम एक हजार रुपये करण्यास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता.16) मंजुरी दिली. 

जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर!​ 

पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या सर्वच प्रकारच्या थुंकीबहाद्दरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. थुंकताना आढळल्यास दीडशे रुपये आणि तोंडाला मास्क नसल्याच पाचशे रुपये दंडाची आकारणी केली जात आहे. दंड भरण्यास नकार देणाऱ्यांवर खटले भरले जात आहेत.

मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडने पेटवली 'मशाल'!

गेल्या 23 एप्रिलपासून ही कारवाई सुरू आहे. तरीही, थुंकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे दंडाची रक्कम एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला होता. त्यास मंजुरी देण्यात आली. आजपर्यंत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सुमारे पाच हजार जणांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCMC decided to impose fine of Rs 1000 on persons who spit in public places