खासदार बारणेंनी लोकसभेत उठवला आवाज; केंद्र सरकारकडे केल्या 'या' दोन मागण्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. भारत देश पण त्याचा सामना करत आहे. मी ज्या राज्यातून येतो, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

पिंपरी : महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी सीएसआरअंतर्गत पीएम केअर फंडात निधी दिला आहे. उद्योगपती पीएम केअर फंडाकरिता निधी देऊ शकतात. परंतु, ज्या राज्यात आपला उद्योग सुरु आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सीएसआर फंड जमा करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे.

लोकहो, आता... ‘शिस्त देवो भवः’​

कोरोना विरोधातील लढाईसाठी महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील उद्योगपतींना त्यांचा सीएसआर निधी सीएम फंडास देण्याची मुभा द्यावी. तसेच केंद्र सरकारमार्फत पीएम केअर फंडातून राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. पीएम केअर फंडात सीएसआर अंतर्गत किती निधी जमा झाला, याची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जम्बो हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळणार 'हे' चार डॉक्‍टर!​ 

खासदार बारणे म्हणाले, जगावर कोरोना महामारीचे संकट आहे. भारत देश पण त्याचा सामना करत आहे. मी ज्या राज्यातून येतो, त्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. या महामारीच्या काळात राज्यातील उद्योगपती, कंपन्याच्या माध्यमातून पंतप्रधान केअर फंडात किती सीएसआर निधी जमा झाला, याची माहिती मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती, कंपन्यांनी पीएम केअरमध्ये सीएसआर निधी जमा केला आहे.

मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडने पेटवली 'मशाल'!

उद्योगपती पीएम केअर फंडासाठी सीएसआर फंड देऊ शकतात. परंतु, ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सीएसआर फंड जमा करू शकत नाहीत, हे राज्यासाठी अन्यायकारक आहे. जे उद्योजक ज्या राज्यात उद्योग करतात, त्या राज्याचे ते काहीतरी देणे लागतात. उद्योजकांनी पीएम फंडाऐवजी सीएम फंडाकरिता जर सीएसआर निधी दिला असता, तर कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला मोठी मदत झाली असती.

कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकारसोबत आहे. त्यामुळे राज्यावर अन्याय न करता केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Barne demanded in Lok Sabha that industrialists in state should deposit CSR funds in CM Care Fund