पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) एक हजार 265 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) एक हजार 265 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 61 हजार 231 झाली आहे. आज एक हजार 272 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 हजार 923 झाली. आज शहरातील 21 जणांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृतांची संख्या एक हजार आठ झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्या 10 हजार 300 आहे. 

ती आली, तिनं पाहिलं अन्‌ लुटून नेलं सारं 

आज मृत झालेल्या शहरातील व्यक्ती पिंपरी (पुरुष वय 69 व 68), संत तुकारामनगर पिंपरी (स्त्री वय 62, पुरुष वय 59), भोसरी (पुरुष वय 52, 79, 41 व 66), वाकड (पुरुष वय 74 व 71), थेरगाव (पुरुष वय 80, 87 व 32), मोशी (पुरुष वय 70), काळेवाडी (पुरुष वय 77 व 64), चिंचवड (पुरुष वय 90, स्त्री वय 70 व 77), सांगवी (स्त्री वय 54, पुरुष वय 47), दापोडी (पुरुष वय 37), दिघी (स्त्री वय 65, पुरुष वय 69), वाल्हेकरवाडी (स्त्री वय 60), पिंपळे निलख (पुरुष वय 80), पिंपळे गुरव (पुरुष वय 47) आणि यमुनानगर (पुरुष वय 35) येथील रहिवासी आहेत. 

मावळ तालुक्यात आजही कोरोनाबाधितांचा आकडा मोठाच

शहरात उपचार सुरू असलेल्या मात्र, मृत झालेल्या शहराबाहेरील व्यक्ती खेड (स्त्री वय 50), येरवडा (पुरुष वय 59 व 50, स्त्री 66), कसबा पेठ पुणे (पुरुष वय 54), खारकुडी (स्त्री वय 80), शिवणे (पुरुष वय 36), लोणावळा (पुरुष वय 66), हडपसर (पुरुष वय 56), जुन्नर (स्त्री वय 80), कर्वेनगर पुणे (स्त्री वय 78), सातारा (पुरुष वय 68) आणि चंदननगर पुणे (स्त्री वय 59) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी दुपारी चार ते शुक्रवारी दुपारी चार या चोवीस तासांत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, एक सप्टेंबरपासून वेगवेगळ्या रुग्णालयांत झालेल्या 20 मृत्यूंची नोंदणी आज महापालिकेच्या डॅशबोर्डवर करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी मृतांची संख्या 41 दिसत आहे. यात शहरातील 28 व शहराबाहेरील 13 जणांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1265 people corona infected in pimpri chinchwad on friday 11 august 2020