esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 135 जणांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 135 जणांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड शहरात आज 172 रुग्ण आढळले.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 135 जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 172 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 89 हजार 283 झाली आहे. आज 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 275 झाली आहे. सध्या एक हजार 450 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच व शहराबाहेरील दोन, अशा सात रुग्णांचा मृत्यू झाला. 

पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडीच्या तीन घटना; लाखांचा ऐवज लंपास 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 558 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 642 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 70 व 46), प्राधिकरण (वय 64) आणि महिला पिंपरी (वय 59), पिंपळे सौदागर (वय 54) येथील रहिवासी आहेत. 

निगडीत जुगार अड्ड्यावर छापा; वीस जणांना अटक 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील महिला पिंपळवंडी (वय 70) आणि नऱ्हे आंबेगाव (वय 65) येथील रहिवासी आहेत. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 658 रुग्ण उपचार घेत आहेत. 792 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 554 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 63 रुग्ण सध्या शहराबाहेरील रुग्णालयात दाखल आहेत.