
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 132 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 647 झाली आहे. आज 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 898 झाली आहे. सध्या दोन हजार 78 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन व शहराबाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून फंडिंग; पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरांचं वादग्रस्त विधान
भारत बंदचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही पडसाद; सर्वसाधारण सभेत जोरदार घोषणाबाजी
शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 671 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 688 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष संत तुकाराम नगर (वय 57), दापोडी (वय 50) व महिला काळेवाडी (वय 55) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष हडपसर (वय 75), जुन्नर (वय 80), धोलवड (वय 62) येथील रहिवासी आहेत.
मणप्पूरम फायनान्सच्या पिंपरी-चिंचवडमधील सोळा शाखा बंद!
सध्या महापालिका रुग्णालयांत 927 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 151 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 159 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 745 जणांची तपासणी करण्यात आली. आज 419 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 73 हजार 745 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.