esakal | गंभीर! पिंपरी-चिंचवडमध्ये आज आठ वाजेपर्यंत 151 पॉझिटिव्ह! 
sakal

बोलून बातमी शोधा

गंभीर! पिंपरी-चिंचवडमध्ये आज आठ वाजेपर्यंत 151 पॉझिटिव्ह! 

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण वाढीचा आकडा झपाट्याने वाढत आहे.

गंभीर! पिंपरी-चिंचवडमध्ये आज आठ वाजेपर्यंत 151 पॉझिटिव्ह! 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग रुग्ण वाढीचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रुग्ण डब्लिंग होण्याचे प्रमाण सात टक्के असल्याचे आयुक्तांनी सांगितले. गुरुवारी मध्यरात्री बारापासून शुक्रवारी रात्री आठपर्यंत संपलेल्या वीस तासात 151 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या दोन 487 झाली. आज दिवसभरात 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 961 जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण एक हजार 484 जण बरे झाले आहेत. आज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 43 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आणखी वाचा- Video : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पिंपरी महापालिका आयुक्तांनी केलं हे भावनिक आवाहन

आज बाधित आढलेले रुग्ण अजंठानगर, जयभीमनगर दापोडी, पवारनगर थेरगाव, गांधी वसाहत नेहरूनगर, भाटनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, कुलदिप अंगण नेहरूनगर, संत तुकारामनगर भोसरी, साई पार्क नेहरूनगर, डांगे चौक थेरगाव, एचडीएफसी कॉलनी चिंचवड, भोईर ब्रीज आकुर्डी, चिखली रोड, केशवनगर कासारवाडी, आनंदनगर चिंचवड, घरकुल, नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी, कृष्णानगर चिंचवड, धावडेवस्ती भोसरी, नाशिक फाटा कासारावाडी, रमाबाईनगर पिंपरी, गांधीनगर, बोपखेल गाव, मोरेवस्ती चिखली, तापकीरनगर काळेवाडी, दळवीनगर, बौध्दविहार दापोडी, सिध्दार्थ कॉलनी काळेवाडी, विठ्ठलनगर, कस्पटेवस्ती वाकड, तुळजाई कॉलनी थेरगाव, मिलींदनगर पिंपरी, जयगणेश साम्राज्य भोसरी, जाधवपार्क आकुर्डी, पदमजी पेपर मिल थेरगाव, महात्मा फुलेनगर चिंचवड, साने वस्ती चिखली, नटराज सोसायटी नेहरुनगर, निगडी प्राधिकरण, पवारनगर जुनी सांगवी, संभाजीनगर भोसरी, श्रीनगर थेरगाव, रिव्हर रोड पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, वडमुखवाडी, बिल्डिंग पिंपरी, सुभद्रा बिल्डिंग पिंपरी, राजे शिवाजीनगर चिखली, ग्रीन एम्पायर चिखली, हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी, काटेपुरम नवी सांगवी, पाटीलनगर चिखली, ममता नगर सांगवी, पिंपळे सौदागर, काळजेवाडी चऱ्होली, दोस्ती बेकरी नेहरुनगर, विशालनगर, साईबाबानगर चिंचवड, रामनगर रहाटणी येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराबाहेरील मॉडल कॉलनी शिवाजीनरगर, बोपोडी, सिहंगड रोड, देहुगाव, बिबेवाडी, दत्तवाडी व गोखलेनगर येथील रुग्णही पॉझिटीव्ह आढळले आहेत. तसेच, आज रमाबाईनगर पिंपरीतील 60 वर्षीय पुरुष, केसरीनगर बोपखेल येथील 65 वर्षीय महिला आणि पुण्यातील सिंहगड रोड येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image