पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी 167 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

पिंपरी-चिंचवड शहरात (ता. ९) बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 814 झाली आहे. आज 281 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 90 हजार 179 झाली आहे. सध्या एक हजार 925 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन व शहराबाहेरील एक रुग्णाचा मृत्यू झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात (ता. ९) बुधवारी 167 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 814 झाली आहे. आज 281 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 90 हजार 179 झाली आहे. सध्या एक हजार 925 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन व शहराबाहेरील एक रुग्णाचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 710 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 689 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष काळेवाडी (वय 43), पिंपरी (वय 55) व महिला कासारवाडी (वय 34) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील महिला जुन्नर (वय 35) येथील रहिवासी आहेत. 

माईक तोडले, ग्लास फोडले, कागदपत्रे फाडली; स्थायी समिती सभेत गोंधळ 

सध्या महापालिका रुग्णालयांत 869 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 56 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 159 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 745 जणांची तपासणी करण्यात आली. आज 468 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 74 हजार 216 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन; चिंचवडमध्ये १३ डिसेंबर रोजी आयोजन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 167 New Corona Patient Found Pimpri Chinchwad