पिंपरी-चिंचवड शहरात 168 नवीन रुग्ण, तर पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 168 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 86 हजार 464 झाली आहे. आज 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरात आज 168 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 86 हजार 464 झाली आहे. आज 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 715 झाली आहे. सध्या दोन हजार 247 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील तीन आणि शहराबाहेरील दोन अशा पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 502 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 620 झाली आहे. 

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 80 व 85), चऱ्होली (वय 36) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष बुलढाणा (वय 57). महिला सासवड (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केले आहेत. आजपर्यंत 19 लाख तीन हजार 70 नागरिकांची तपासणी केली. त्यात चार हजार 608 व्यक्तींच्या घशातील द्रावांचे नमुने तपासण्यात आले. त्यात 161 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 168 new corona patients in Pimpri-Chinchwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: