पिंपरीत 17 पॉझिटिव्ह; भोसरी, आनंदनगर, रुपीनगरमधील रहिवासी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

शहरातील सात आणि शहराबाहेरील 10 अशा 17 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारी (ता. 19) आढळले.

पिंपरी  : शहरातील सात आणि शहराबाहेरील 10 अशा 17 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारी (ता. 19) आढळले. यात आंबेगाव तालुका व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर, येरवडा, कँटोन्मेंट भागातील सात जणांचा समावेश आहे. दरम्यान, भोसरी आळंदी रोड बनाचा ओढा आणि चऱ्होलीतील वडमुखवाडी अलंकापुरम रोड परिसर सील करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सात जण भोसरी, रुपीनगर, आनंदनगर परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान, आज भोसरीतील दोघांचा मृत्यू झाला. यात एक 78 वर्षीय पुरुष व एका 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

#CoronaVirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कशी झाली कोरोनाची 'एंट्री'...वाचा सविस्तर....

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. सोमवारी (ता. 18) आनंदनगरमध्ये 18 जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना चिंचवड स्टेशन परिसरातील शाळेत क्वॉरंटाइन करण्यात आले असून, त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यातील काहींचे रिपोर्ट मंगळवारी आले. त्यातील पाच जण पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे एकट्या आनंदनगरमधील रुग्णांची संख्या 33 झाली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आनंदनगरसह भोसरी व रुपीनगरमधील सात जणांना आज बाधा झाली. त्यात तीन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, भोसरीतील क्षितीज डेस्टिनेशन, ग्लोबल स्कूल, दुर्वांकूर लॉन्स, बनाचा ओढा आणि चऱ्होलीतील वडमुखवाडी अलंकापुरम रोड, श्रीसमर्थ गॅरेज, शिवराज ग्रीनटेक, नील मोटर्स परिसर सील करण्यात आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 corona positive were found in Bhosari, Rupinagar and Anandnagar areas