esakal | मावळवासीयांना दिलासा; आज रुग्णसंख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

मावळवासीयांना दिलासा; आज रुग्णसंख्या घटली

मावळ तालुक्यात सोमवारी रुग्ण संख्येबाबत मोठा दिलासा मिळाला.

मावळवासीयांना दिलासा; आज रुग्णसंख्या घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात सोमवारी रुग्ण संख्येबाबत मोठा दिलासा मिळाला. दिवसभरात १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर लोणावळा येथील कोरोनाबाधित ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दोन हजार ३९१ झाली असून, आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ६९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १७ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक सहा, लोणावळा येथील तीन, कामशेत व काले येथील प्रत्येकी दोन; तर टाकवे बुद्रुक, सोमाटणे, वळख व नाणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार ३९१ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ३१८, तर ग्रामीण भागातील एक हजार ७३ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ७९०, लोणावळा येथे ३६९, तर वडगाव येथे रुग्णसंख्या १५९ एवढी झाली आहे. आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ६९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारी ६१ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ६०० सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३२२ जण लक्षणे असलेले, तर २७८ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३२२ जणांपैकी २१४ जणांमध्ये सौम्य, तर ९० जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १८ जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६०० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

loading image