esakal | पिंपरीत आढळले 193 पॉझिटीव्ह रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

  193 positive patients found in Pimpri 20 Oct 2020

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 193 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 850 झाली आहे. आज 334 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 110 झाली आहे. सध्या दोन हजार 240 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सात आणि शहराबाहेरील चार अशा 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 492 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 614 झाली आहे. 

पिंपरीत आढळले 193 पॉझिटीव्ह रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात काल 193 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 85 हजार 850 झाली आहे. काल 334 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 110 झाली आहे.

सध्या दोन हजार 240 सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील सात आणि शहराबाहेरील चार अशा 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 492 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 614 झाली आहे. 

सात महिन्यांनी भरला वाडेश्वर कट्टा; महापौर, मनपा आयुक्त उपस्थित 

काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चऱ्होली (वय 79), दापोडी (वय 57), चिंचवड (वय55), दिघी (वय 56). महिला चिंचवड (वय 94 व 60), भोसरी (वय 60) येथील रहिवासी आहेत. काल मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष सातारा (वय 82), चाकण (वय 49 व 58), शिवणे (वय 43) येथील रहिवासी आहेत. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरात एक हजार 314 पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत 12 लाख 92 हजार 840 जणांचे सर्वेक्षण केले. दोन हजार 858 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 103 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

कोरोनामुळे नारळ उत्पादकांसह व्यावसायिकांना फटका; नवरात्रात मागणी निम्म्याने घटली