पिंपरी-चिंचवड शहरात आज 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 922 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 922 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 32 हजार 565 झाली आहे. आजपर्यंत एकूण 22 हजार 453 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात नऊ हजार 538 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 20 जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 538 झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण? राष्ट्रवादीकडून हे पाच जण इच्छुक 

आज मयत झालेल्या व्यक्ती काळभोरनगर (पुरूष वय ७६), खराळवाडी (पुरूष वय ४८), निगडी (पुरूष वय ७२), चिखली (पुरूष वय ७०), भोसरी (पुरूष वय ६०), चिंचवड (पुरूष वय ५३), वाल्हेकरवाडी (पुरूष वय ८०), लोणावळा (पुरूष वय ६५), धायरी (पुरूष वय ७३), आळंदी (पुरूष वय ६५), मुळशी (पुरूष वय ५०), मरकळगाव (पुरूष वय ३६), जुन्नर (पुरूष वय ६४), नेहरूनगर (स्त्री वय ७०), रहाटणी (स्त्री वय ५३), रहाटणी (स्त्री वय ७५), भोसरी (स्त्री वय ६०), काळेवाडी (स्त्री वय ८५), यमुनानगर (स्त्री वय ६९), देहूरोड (स्त्री वय ६८) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांनो, स्मार्ट सिटीसाठी 'एवढ्या' कोटींना मंजुरी

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 corona patients death in pimpri chinchwad on thursday 13 august 2020

Tags
टॉपिकस