शिरुर लोकसभा मतदारसंघ सक्षमीकरणासाठी भाजपचे २१ कार्यक्रम - माधुरी मिसाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA  Madhuri Misal

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘लोकसभा प्रवास योजना’ आखण्यात आली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ सक्षमीकरणासाठी भाजपचे २१ कार्यक्रम - माधुरी मिसाळ

पिंपरी - शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘लोकसभा प्रवास योजना’ आखण्यात आली आहे. या योजने अंतर्गत २१ कार्यक्रमांचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात केंद्रीय केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. दि. १४, १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ असे तीन दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मतदार संघाच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी रविवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरीत भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संयोजक ॲड. धर्मेंद्र खांडरे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अशा बुचके, माजी सदस्य शरद बुट्टे पाटील, राहुल पाचारणे, अतुल देशमुख, रोहिदास उंद्रेपाटील आदी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीस भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.

आमदार मिसाळ म्हणाल्या की, भाजपच्या केंद्रीय समितीने देशात लोकसभा प्रवास योजनेसाठी १४४ लोकसभा मतदारसंघांची निवड केलेली आहे. भाजपचे खासदार नसलेले हे मतदारसंघ सक्षमीकरणासाठी निवडले आहे. या पैकी हाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघ असून त्यात पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुर हे दोन मतदार संघ निवडले आहे. ही योजना दीड वर्षे राबविली जाणार आहे. केंद्रीय आदवासी राज्यमंत्री रेणुका सिंग या अनुभवी नेत्या असून त्यांच्या अनुभवाचा लाभ शिरुर लोकसभा मतदारसंघ सक्षम करण्यासाठी घेण्यात येणार आहे.

या तीन दिवसांच्या दौऱ्यात बुथनुसार नियोजनाची पाहणी, लोकसभा समितीच्या नियोजनाचा आढावा, संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, केंद्राच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद, भाजपच्या पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, मंदिर, हुतात्मा राजगुरु यांच्या वाड्याला भेट, वारकरी पंथाच्या मान्यवरांच्या गाठीभेटी, जुन्नरमध्ये आदीवासींना भेट, शासकीय अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक, असे २१ कार्यक्रम आयोजित केले असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

भाजपमध्ये आदेशानुसार काम केले जाते. संघटना वाढविणे, या जिवावरच आम्ही पुढे आलो आहोत. समोर कोण आहे याचा विचार आम्ही करत नाही. भाजप की शिवसेना शिंदे गट या पैकी कोण निवडणूक लढविणार हे पक्ष ठरवेल. सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघात पक्ष कार्यक्षम करणे हेच नियोजन आहे. केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंग सर्व विभागांमधील विकास कामांचाही आढावा घेणार आहेत. त्यानुसार त्या केंद्रापर्यंत अहवाल देणार आहेत.

- आमदार माधुरी मिसाळ, निवडणूक प्रभारी, शिरुर लोकसभा मतदारसंघ.

Web Title: 21 Programs Of Bjp For Empowerment Of Shirur Loksabha Constituency Madhuri Misal Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..