it.jpg
it.jpg

आयटीयन्स पुढे आता 'ही' एक चिंतेची बाब... 

पिंपरी : कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर आयटी कंपन्यांनी आपल्याकडील काम कमी झाले आहे, नवीन प्रोजेक्‍ट नाहीत, अशी कारणे पुढे करत कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीला सुरुवात केली. लॉकडाउन सुरु झाल्यापासून आतापर्यंत विविध कारणांसाठी आयटी कर्मचाऱ्यांकडून नोंदवण्यात आलेल्या 72 हजार तक्रारीमध्ये पगार कपातीच्या तक्रारीची संख्या 50 हजार असल्याचे असल्याचे समोर आले आहे. कंपन्यांकडून कपात केलेल्या पगाराची रक्‍कम अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नसल्यामुळे आयटीयन्स चिंतेत सापडले आहेत. 

सद्यस्थिती काय ? 
लॉकडाउनला सुरुवात झाल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणे, कपात करणे असे प्रकार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काहीजणांनी याबाबत पुढे येत आयटी संघटनांच्या माध्यमातून कामगार आयुक्‍तांकडे तक्रार नोंदवली. याबाबत आपण काही बोललो तर नोकरी गमवावी लागेल या भीतीपोटी काहीजणांनी वस्तूस्थिती मान्य करत काम करणे सुरु ठेवले. दरम्यान, आता लॉकडाउन शिथिल होउ लागला असून आयटी कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरु होत असून परिस्थिती पूर्वपदावर येउ लागली आहे. मात्र, असे असताना देखील या कंपन्यांनी कामगारांचे कापलेले पगार अद्यापपर्यंत पूर्ववत केलेले नाहीत, त्यामुळे हैराण झालेले आयटीयन्स न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. आयटीयन्सना भेडसावत असणाऱ्या या प्रश्‍नाबाबत कामगार आयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेउन त्यावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी आयटी संघटनांकडून करण्यात येत आहे. 

आयटी कंपन्यांना सरकारकडून मदत... 
आयटी कंपन्यांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने 2015मध्ये त्यासाठी आयटी धोरण देखील तयार केले. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आयटी कर्मचाऱ्यांचे पगार कमी करु नका, त्यांना नोकरीवरुन काढू नका, असे सरकारकडून सांगण्यात आलेले असताना देखील कंपन्यांनी आपले नियम लावल्यामुळे या कर्मचाऱ्यासमोरील अडणीत भर पडल्याचे नॅशनल इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटेच सरचिटणीस हरप्रित सलुजा यांनी सांगितले. 

आयटी कर्मचाऱ्यासाठी वेबिनार...
लॉकडाउनच्या काळात पगार कपात, थकित पगार, नोकरी गमावलेल्या आयटीयन्सना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी येत्या रविवारी पाच जुलै रोजी नॅशनल इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटतर्फे संघटनेतर्फे संध्याकाळी ऑनलाइन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लेबर लॉ प्रक्‍टिशनर असोसिएशनचे ऍड. गौरव पोळ हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात कामगार कायद्यात कोणत्या तरतूदी आहेत, आयटीयन्स त्यामध्ये कशी दाद मागू शकतात, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

आकडे बोलतात...
* तीन महिन्याच्या अवधीत आयटी कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारी : 72, 000 
* पगार कपात आणि थकित पगार यासंदर्भातील तक्रारी : 50, 000 
* नोकरीवरुन काढून टाकल्याच्या तक्रारी : 22, 000

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com