पिंपरी-चिंचवडमध्ये २२७ नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी २२७ रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच आकडा दोनशेच्या वर गेला. एकूण रुग्णसंख्या एक लाख दोन हजार २३७ झाली आहे. काल ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी २२७ रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच आकडा दोनशेच्या वर गेला. एकूण रुग्णसंख्या एक लाख दोन हजार २३७ झाली आहे. काल ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९८ हजार ९७ झाली आहे. सध्या दोन हजार ३१३ सक्रिय रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल शहरातील व शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही. कालपर्यंत शहरातील एक हजार ८२७ आणि बाहेरील ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ७१० जणांना लस देण्यात आली. कालपर्यंत १४ हजार ८६५ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ७८१ रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार ५३२ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांनो मास्क घालूनच बाहेर पडा; नाही तर दंड!

कंटेन्मेंट झोनमधील ४५६ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार ३८९ जणांची तपासणी केली. ७७१ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख २६ हजार ८६२ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

पिंपरी : एचआयव्ही रुग्णांना हवीय स्वतंत्र ओपीडी

काल दोन हजार १६८ संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार ५५३ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. एक हजार २६१ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार ९७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कालपर्यंत सहा लाख ४१ हजार ९३१ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ३८ हजार ४३३ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख ३६ हजार २९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 227 New Corona Patients Found in Pimpri Chinchwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: