पिंपरी : एचआयव्ही रुग्णांना हवीय स्वतंत्र ओपीडी

YCM-Hospital
YCM-Hospital

पिंपरी - महापालिकेचे वायसीएम रुग्णालयाचा तळ मजला...सकाळचे साडेनऊ वाजलेले... एआरटी सेंटर परिसर... शहरासह खेळ, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील रुग्ण ओपीडीसमोर बसलेली... सर्वांच्या तोंडाला रुमाल लावलेला... तो कोरोना आहे म्हणून नव्हे तर, स्वतःची ओळख पटू नये म्हणून. त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले की, गर्दीच्या ठिकाणी ओपीडी असल्याने त्यांना संकोच वाटतो आहे. तो घालवण्यासाठी एआरटी ओपीडीसाठी वायसीएम इमारतीच्या एका बाजूस स्वतंत्र जागा हवी. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकार, महापालिका व जानकीदेवी बजाज सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे पीपीपी तत्त्वावर २००८ पासून वायसीएममध्ये एआरटी ओपीडी अर्थात एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांसाठी औषधोपचार केंद्र सुरू आहे. त्यांची तपासणी व समुपदेशन करून औषधे दिली जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील रुग्ण येथे येतात. दररोज दोनशे ते अडीचशे रुग्ण ओपीडीत येत असतात. या केंद्रासाठी वायसीएमने जागा दिली आहे. सरकार औषधे आणि जानकीदेवी बजाज फाउंडेशन मनुष्यबळ पुरवते. रुग्ण आल्यानंतर आयसीटीसी सेंटरमध्ये जातो. तेथून रिपोर्ट घेऊन एआरटी सेंटरला येतो. तपासणी व समुपदेशन करून औषध (गोळ्या) दिले जाते. रक्त तपासणी लॅबमध्ये केली जाते. 

... तर बाळांना धोका कमी 
एआरटी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला विश्‍वकर्मा म्हणाल्या, ‘‘एचआयव्हीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात भीती कायम आहे. काही रुग्ण उघडपणे बोलतात. आजार न लपवता डॉक्टरांना भेटतात. ओपीडीच्या जागेबाबत अद्याप आमच्याकडे कोणी तक्रार केलेली नाही.’’ 

लवकर उपचार घेतल्यास अन्य आजारांवर मात करता येईल. मात्र, रुग्णांना कायमस्वरूपी गोळ्या घ्याव्या लागतात. त्या व्यवस्थित घेतल्यास रुग्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. प्रत्येक रुग्णाची प्रत्येक महिन्याला तपासणी केली जाते. एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांनी गरोदरपणात गोळ्या घेतल्यास जन्माला येणाऱ्या बाळांना धोका कमी असतो, असेही डॉ. विश्‍वकर्मा यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात रूग्ण
१७४४५ - २००८ पासून
२६९७ - पुरुष
३११९ - महिला
१३ - इतर
२३ - गरोदर महिला

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com