पिंपरी-चिंचवड शहरात 235 नवीन रुग्ण; तर एवढे झाले मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 235 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 750 झाली आहे. आज 226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 860 झाली आहे. सध्या दोन हजार 272 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. काल तेरा जणांचा मृत्यू झाला होता. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 235 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 91 हजार 750 झाली आहे. आज 226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 860 झाली आहे. सध्या दोन हजार 272 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. काल तेरा जणांचा मृत्यू झाला होता. आज शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 618 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 667 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष काळेवाडी (वय 47), वडमुखवाडी (वय 68), भोसरी (वय 62) आणि महिला चिंचवड (वय 75) येथील रहिवासी आहेत. 

सध्या महापालिका रुग्णालयांत 931 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 341 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 186 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सात हजार 10 रुग्ण बरे झाले आहेत.

पिंपरी - शेतकरी व कामगार कायद्यातील बदलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 373 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 487 जणांची तपासणी करण्यात आली. आज 468 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 69 हजार 78 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 235 new corona patients in pimpri chinchwad