esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये २४४ नवीन रुग्ण; आज ३३९ जणांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

पिंपरी-चिंचवडमध्ये २४४ नवीन रुग्ण; आज ३३९ जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात गुरुवारी २४४ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या (Corona Patient) दोन लाख ५३ हजार २२२ झाली आहे. आज ३३९ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४६ हजार १७९ झाली आहे. (244 New Corona Patients in Pimpri Chinchwad)

सध्या दोन हजार ८४० सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार २०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ६४५ रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार १९५ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

हेही वाचा: खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून उकळले तब्बल ६ कोटी

आजपर्यंत पाच लाख २१ हजार ८६३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ९४ मेजर व ६९९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ९३० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. तीन हजार ६१३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image