कौतुकास्पद : भटक्‍या कुत्र्यांसाठी 'ते' ठरतायेत अन्नदाते 

आशा साळवी
Sunday, 30 August 2020

  • ऐन लॉकडाउनच्या काळात आले धावून
  • सुमारे 30 हजार मुक्‍या प्राण्यांना दिले अन्न 

पिंपरी : लॉकडाउनच्या काळात जिथं माणसांच्या जेवणाची सोय नव्हती, तिथं मुक्‍या प्राण्यांचं काय? मात्र, मुक्‍या जिवांची भूक भागविण्यासाठी 25 स्वयंसेवकांचा गट पुढे सरसावला. सलग पाच महिन्यांपासून त्यांनी दिवसाला दोनशे याप्रमाणं सुमारे 30 हजार भटक्‍या कुत्र्यांना दररोज अन्न पुरवून नवसंजीवनी देण्याचं अभियान हाती घेतलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनामुळं कुत्र्यांना अन्न मिळण्याची सोय नाही. या उद्देश्‍याने सुरुवातीला 60 ते 70 कुत्र्यांना अन्न पुरवण्यास प्रारंभ केला अन्‌ दररोज दोनशेहून अधिक कुत्र्यांना खायला दिलं. ही संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. सर्व कुत्र्यांना अन्न देण्याची इच्छा असून, केवळ पैशांअभावी अडचणी आल्या. मात्र, स्वयंसेवकांनी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी मदत केली. त्यामुळं त्यांचा हा उपक्रम अखंडपणे सुरूय. प्रत्येकी 20 किलो अन्न, असे 15 पोती मिळाले. शंभर किलो तांदूळ, 90 किलो पोहे मिळाले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, कुत्र्यांसाठी हे अन्न अपूर्ण असल्यानं भात व पोहे समप्रमाणात मिक्‍स करून त्यात पेडीग्री किंवा चिकन मिसळून खाऊ घालताहेत. या लॉकडाउनमध्ये प्रत्येकी 20 किलो याप्रमाणं 60 पोत्यांची आवश्‍यकता आहे. एखादी व्यक्ती आम्हाला दररोज एक किलो चिकन देण्याची जबाबदारी घेऊ शकते. परंतु, पोहे किंवा अंडी हा कॉम्बो अधिक चांगला पर्याय ठरू शकतो, असं स्वयंसेवक आकांक्षा मिश्रा, ओजस कुलकर्णी, सिद्धेश मेहेर, श्रुती बोरा, शशांक मिश्रा, प्रतीक गावडे, अखिलेश नायर, भूषण धाकड, राहुल पलांडे, अक्षय सावंत, श्‍वेता अग्रवाल यांनी सांगितलं. 

येथे केला अन्नपुरवठा... 

चाकण, भोसरी, चिंचवड एमआयडीसी, मोरवाडी क्रॉसरोड व ऑटो क्‍लस्टर, चिंचवड स्टेशन, मोहननगर, परिवहननगर, लोडा बेलमंडोपर्यंत किवळे क्रॉसरोड, रावेत क्षेत्र, मोरया गोसावी, केशवनगर, काकडे पार्क चिंचवड, वाकड ते किवळे, औंध रावेत महामार्ग, नाशिक फाटा ते मोशी, त्रिवेणीनगर, रुपीनगर, स्पाईन रस्ता, तळवडे रस्ता येथील परिसरातील कुत्र्यांना अन्न पुरवठा केला आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो आनंदाची बातमी; आता पाण्याची चिंता मिटली

मुळशी, पवनाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांचा चुकतोय काळजाचा ठोका

कधी कधी अन्नसाठा कमी असल्यामुळं काही ठिकाणी दिवसाआड अन्न भरविण्यास जातो. कुत्र्यांना अन्न देताना मन हेलावून टाकणाऱ्या काही घटना समोर आल्या. बहुतांश कुत्री खूप दिवसांपासून उपाशी होती, तर काही जखमी होती. शक्‍य तेवढ्या कुत्र्यांची निवारागृहात सोय करतो. 
- श्रुती बोरा, स्वयंसेवक 

  • 25 स्वयंसेवकांचा एक गट 
  • दररोज 200 कुत्र्यांना जेवण 
  • दर दिवशी 60 किलो अन्नाची गरज 

Edited by Shivnandan Baviskar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 volunteers stepped forward to feed dogs in pimpri chinchwad