esakal | Video : कर्नाटकातील २८६ मजूरांना एसटीने सोडण्यास सुरूवात, १३ गाड्यांची व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Vallabhnagar

गेल्या दीड महिन्यांपासून शहरात अडकून पडलेल्या २८६ मजूर प्रवाशांची वल्लभनगर एसटी स्थानकावरून १३ गाड्यांद्वारे पाठवणी करण्यास सुरूवात झाली. बहुतेक सर्व प्रवासी कर्नाटकातील असून त्यांना अक्कलकोट, उमरगा येथे सोडण्यात येणार आहे. 

Video : कर्नाटकातील २८६ मजूरांना एसटीने सोडण्यास सुरूवात, १३ गाड्यांची व्यवस्था

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गेल्या दीड महिन्यांपासून शहरात अडकून पडलेल्या २८६ मजूर प्रवाशांची वल्लभनगर एसटी स्थानकावरून १३ गाड्यांद्वारे पाठवणी करण्यास सुरूवात झाली. बहुतेक सर्व प्रवासी कर्नाटकातील असून त्यांना अक्कलकोट, उमरगा येथे सोडण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात ठिकाणी अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, भाविक आणि स्थलांतरित कामगारांना राज्य शासनाने एसटी मार्फत, त्यांच्या इच्छित स्थळी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत, पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एसटी स्थानकावर देखील शहरात अडकलेल्या लोकांसाठी एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. 

आगार व्यवस्थापक सुनील हिवाळे म्हणाले, "पोलीसांकडील प्रवाशांच्या याद्या काल (सोमवारी) तयार झाल्या नव्हत्या. मंगळवारी सकाळी सुरूवातीला ५३२ लोकांसाठी २५ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांची संख्या कमी झाल्याने १० गाड्या देखील कमी करण्यात आल्या. सध्या पोलीसांच्या यादीमधील १३ गाड्यांमधून २८६ प्रवाशांना अक्कलकोट, उमरगा येथे पाठविले जात आहे. यातील, बहुतेक प्रवासी हे कर्नाटकातील मजूर आहेत.

पिंपरी : लॉकडाउनचा असा व्यक्त होतोय राग; गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ

या सर्वांना पोलीसांनी पास दिले असून प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. स्थानकावर त्यांची पुर्नतपासणी केली जात आहे. त्यासाठी, ७ ते ८ डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीसांकडून आणखी १०० लोकांची यादी मिळणे अपेक्षित आहे. या सर्व प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविण्यासाठी ६० चालकांना कामावर बोलविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार, सध्या १७ मे पर्यंत अडकलेल्या लोकांसाठी शासकीय खर्चाने बस व्यवस्था करण्यात येणार आहे."

loading image