
लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा या विवंनचेने झालेले मानसिक खच्चीकरण, दीड महिन्यापासून घरातच बसून असल्याने आलेली अस्वस्थता आदी कारणांमुळे अनेकांमध्ये चिडचिडेपणा व राग उफाळून येऊ लागला आहे. हा राग कुटुंबातील सदस्य, घराशेजारील व्यक्ती यांच्यावर व्यक्त होत असल्याने भांडणाचे प्रकार वाढले आहेत. यामुळे मागील काही दिवसांत गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला आहे.
पिंपरी - लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा या विवंनचेने झालेले मानसिक खच्चीकरण, दीड महिन्यापासून घरातच बसून असल्याने आलेली अस्वस्थता आदी कारणांमुळे अनेकांमध्ये चिडचिडेपणा व राग उफाळून येऊ लागला आहे. हा राग कुटुंबातील सदस्य, घराशेजारील व्यक्ती यांच्यावर व्यक्त होत असल्याने भांडणाचे प्रकार वाढले आहेत. यामुळे मागील काही दिवसांत गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. घरातून बाहेर पडण्यास मनाई असल्याने सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही, नोकऱ्या संकटात आहेत. यामुळे पुढे काय होणार, हा प्रश्न सतावत असून अनेकजण तणावात आहेत. अशातच कुटुंबात अथवा शेजाऱ्याशी शुल्लक कारणावरून वाद झाल्यास अगोदरच लॉकडाऊनमुळे तणावात असलेल्या व्यक्तीकडून रागाच्या भरात वेगळेच पाऊल उचलले जात आहे. यामुळे मागील काही दिवसात हाणामारी, दुखापत या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजचा दिवस दिलासादायक; तर पुण्यातील एकाचा मृत्यू
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पंधरा पोलिस ठाण्यात 5 ते 10 मे या कालावधीत 72 गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये 38 गुन्हे हे जवळचे नातेवाईक तसेच शेजारील व्यक्तींशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घडलेले आहेत.
तर लॉकडाउन असल्याने टाईमपास करण्यासाठी शेतात जाऊन गप्पा मारत असताना वितुष्ट निर्माण झाल्याने मित्रानेच मित्राला विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भांबोली येथे (7 मे ) रोजी उघडकीस आली.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा गुन्ह्यांचा आलेख वाढू लागला आहे. हिंजवडी, वाकड, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन खुनाच्या घटनांसह जबरी चोरी, दुखापत, पोलिसांवर हल्ला, मारामारी, लैंगिक अत्याचार यासारख्या गुन्ह्यांचीही नोंद विविध पोलिस ठाण्यात झाली आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत 5 ते 10 मे या कालावधीत दुखापतीच्या 29 घटना तर गर्दी व मारामारीच्या नऊ घटना घडल्या. तर खुनाच्या तीन घटनांची नोंद झाली आहे.
5 ते 10 मे दरम्यान दाखल झालेले गुन्हे
तारीख दाखल गुन्हे
5 (मंगळवार) 19
6 (बुधवार) 12
7 (गुरुवार) 12
8 (शुक्रवार) 8
9 (शनिवार) 11
10 (रविवार) 10