पिंपरीकरांनो, आता 'या' मृत्यूच्या आकड्याची दखल घ्या; आतातरी निष्काळजीपणा नको!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

पिंपरी चिंचवड शहरात आज तब्बल 30 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज तब्बल 30 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. आजपर्यंत एकूण 685 जणांचा मृत्यू झाला आहे. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता 

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आज 807 जण बाधित आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 36 हजार 863 झाली आहे. शहराबाहेरील 22 रुग्ण आज शहरातील रुग्णालयात दाखल झाले. आज 478  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 25 हजार 258 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 10 हजार 920 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आज मयत झालेल्या व्यक्ती मोरवाडी (पुरूष वय ६७), संत तुकाराम नगर, पिंपरी (पुरूष वय ७५), चिंचवड (पुरूष वय ८१), अजमेरा, पिंपरी (पुरूष वय ६३), चिखली (पुरूष वय ७०), चिखली (पुरूष वय ६२), चिखली (पुरूष वय ६०), चिखली (पुरूष वय ३५), तळवडे (पुरूष वय ३५), भोसरी (पुरूष वय ४६), भोसरी (पुरूष वय ३१), दिघी (पुरूष वय ७३), 
बोपखेल (पुरूष वय ४२), खराळवाडी (पुरूष वय ५२), थेरगाव (पुरूष वय ६८), निगडी (पुरूष वय ८४), वाकड (पुरूष वय ७१), वल्लभनगर (पुरूष वय ६५), वाल्हेकरवाडी (पुरूष वय ३५), हिंजवडी (पुरूष वय ४९), कामशेत (पुरूष वय ६३), निघोजे, खेड (पुरूष वय ५६), जुन्नर (पुरूष वय ६७), मावळ (पुरूष वय ४७), तळेगाव, दाभाडे (पुरूष वय ६६), आकुर्डी (स्त्री वय ७०), आकुर्डी (स्त्री वय ७८), भोसरी (स्त्री वय ५९), अजंठानगर (स्त्री वय ६०), देहूरोड (स्त्री वय ६६) येथील रहिवासी आहेत.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 deaths in Pimpri Chinchwad today