पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 453 नवीन रुग्ण 

Corona Patient
Corona Patient

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 453 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार  503 झाली आहे. काल 457 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 99 हजार 510  झाली आहे. सध्या तीन हजार 157 सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. कालपर्यंत शहरातील एक हजार 836 आणि शहराबाहेरील 772 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 983 जणांना लस देण्यात आली. कालपर्यंत 21 हजार 629 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 803 रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार 354 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंटेन्मेंट झोनमधील 656 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 936 जणांची तपासणी केली. 934 जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख 33 हजार 446 जणांचे विलगीकरण करण्यात आले. काल दोन हजार 186 संशयित रुग्णालयात दाखल झाले. दोन हजार 912 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 534 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 190 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कालपर्यंत सहा लाख 55 हजार 364 संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख 50 हजार 327 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख 49 हजार 873 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष पिंपरी (वय 41), पिंपळे सौदागर (वय 68) व महिला पिंपळे गुरव (वय 75) येथील रहिवासी आहेत. काल शहराबाहेरील कोणाचाही मृत्यू झाला नाही.

प्रभाग कार्यालयनिहाय बाधित रूग्ण पुढील प्रमाणे....
अ- 37, ब- 73, क- 61, ड- 79, इ-77, फ- 48, ग-50, ह- 28.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com