पिंपरी-चिंचवडच्या 487 पोलिसांना नववर्षानिमित्त मिळाली अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 487 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मिळालेल्या या गिफ्टमुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. या बाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 487 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मिळालेल्या या गिफ्टमुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. या बाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत. 

हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचे कौतुक करून मनोबल वाढविल्यास ते अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावतील, या दृष्टिकोनातून आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. 

चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड 

यामध्ये शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील व विविध ठिकाणी काम करणाऱ्या 272 पोलिस शिपाई यांना पोलिस नाईक, 150 पोलिस नाईक यांना हवालदार तर 65 पोलिस हवालदार यांना सहायक फौजदारपदी पदोन्नती मिळाली आहे. या बाबतचा आदेश 31 डिसेंबर 2020 ला रात्री पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढला. 

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी अभिनंदन केले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 487 police Pimpri Chinchwad unique gift occasion New Year