पवना धरणात ४९.४८ टक्के पाणीसाठा

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण परिसरात जोरात पाऊस असल्याने पिंपरी चिंचवड शहरवांसीयांसह मावळसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.
Pawana-Dam
Pawana-Damsakal
Summary

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण परिसरात जोरात पाऊस असल्याने पिंपरी चिंचवड शहरवांसीयांसह मावळसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

पिंपरी - मावळ तालुका परिसरात गेल्या अकरा दिवसांपासून संततधार पाऊस कायम आहे. त्यामुळे पवन धरणात अल्प कालावधीत तब्बल २७ टके साठा वाढला आहे. धरणात बुधवारी (ता.१३) सायंकाळी सातवाजेपर्यंत ४९.४८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३३.६० टक्के इतका पाणीसाठा होता.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण परिसरात जोरात पाऊस असल्याने पिंपरी चिंचवड शहरवांसीयांसह मावळसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने संपूर्ण जून महिना दांडी मारली होती. पाऊस लांबल्याने चिंता वाढली होती. परंतू जुलैच्या ४ तारखेला पवना धरणातील पाणीसाठा १६.२६ टक्के खाली पोहचला होता. त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार कायम आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत १५०३१मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुरेसा पाणीसाठा होऊ लागल्याने पाणीटंचाईचे संकटही टळले आहे. ही बाब पिंपरी चिंचवड शहरांतील नागरिक तसेच, मावळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास जुलै महिना अखेरपर्यंत पवना धरण १०० टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास जुलैअखेर पवना धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता व्‍यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com