Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये 76 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

शहरात बुधवारी 76 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 528 झाली. आज 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 711 झाली आहे.

पिंपरी - शहरात बुधवारी 76 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख 528 झाली. आज 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 711 झाली आहे.

Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ

सध्या दोन हजार दोन सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच व बाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 815 आणि बाहेरील 761 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 515 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत सात हजार 51 जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 538 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 464 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 397 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. 875 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले.

शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 76 new Coronavirus patients in Pimpri-Chinchwad