Farmers Protest : रिहानाला राहुल गांधींचं सडेतोड उत्तर; पाहा व्हिडिओ

Rihanna_Rahul
Rihanna_Rahul

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन सत्ताधारी मोदी सरकारला पुन्हा लक्ष्य केलं आहे. शेतकऱ्यांना घाबरवणं, धमकावणं आणि मारणं हे सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा, तसेच कृषी कायदे मागे घ्यावेत, कारण शेतकरी मागे फिरणार नाहीत. शेतकरी आंदोलनाबाबत मंगळवारी (ता.२) ट्विट केलेल्या पॉप सिंगर रिहाना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर नामांकित व्यक्तींनाही खडसावले आहे.

ही आमची अंतर्गत बाब
राहुल पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी देश वाचवला आहे, ते आमच्या पाठीचा कणा आहेत, पण सरकार त्यांना नुकसान पोचवू पाहत आहे. तसेच काही हॉलिवूड सेलिब्रिटीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. याला उत्तर देताना 'शेतकरी आंदोलन ही आमची अंतर्गत बाब आहे,' असं राहुल यांनी म्हटलं आहे.

शेतकरी सरकारचे शत्रू आहेत का?
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार नाकाबंदी का करत आहे? सरकारला शेतकऱ्यांची भीती वाटत आहे का? का सरकार शेतकऱ्यांना घाबरत आहे? शेतकरी सरकारचे शत्रू आहेत का? शेतकरी हे देशाची ताकद असून त्यांना धमकावणं, घाबरवणं मारणं हे सरकारचं काम नाही.

कायदे मागे घ्यावे लागतील
सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून यामधून मार्ग काढणे आवश्यक आहे. त्याऐवजी सरकार कायदे पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. कायदे दोन वर्षे पुढे ढकलणे म्हणजे नक्की काय? दिल्लीला किल्ल्यासारखं स्वरुप का येत आहे? सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही, सरकारचं असं वागणं देशाच्या प्रतिष्ठेसाठी चांगलं नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

शेतकरी माघार घेणार नाहीत
नव्या शेती कायद्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे. शेतकरी मागे हटणारे नाहीत. शेवटी सरकारलाच माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आजच याबाबत निर्णय घेणं योग्य होईल, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

हा कसला राष्ट्रवाद?
संरक्षण क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदींचाही राहुल यांनी खरपूस समाचार घेतला. भारतीय सैन्याचे जवान लडाखमध्ये बर्फात उभे आहेत. त्यांना चांगल्या सोयी-सुविधांसाठी सरकार पैसे का देऊ शकत नाही, हे कोणत्या प्रकारचं देशप्रेम आहे, हा कोणता राष्ट्रवाद? असा सवालही राहुल यांनी सरकारला विचारला आहे.

 - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com