esakal | पिंपरी-चिंचवड शहरात 943 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update.jpg

पिंपरी चिंचवड शहरात आज 943 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 54 हजार 230 झाली आहे. आज पर्यंत 43 हजार 108 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात सहा हजार 986 रुग्ण दाखल आहेत. आज 820 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात 943 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात आज 943 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 54 हजार 230 झाली आहे. आज पर्यंत 43 हजार 108 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात सहा हजार 986 रुग्ण दाखल आहेत. आज 820 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण 315 आहेत. तर, पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण संख्या 885 आहे. आजपर्यंत एक हजार 131 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील 923 आणि शहराबाहेरील 208 जणांचा समावेश आहे. आज 24 जणांचा मृत्यू झाला. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

आज मयत झालेल्या व्यक्ती पुनावळे (पुरूष वय ७५), काळेवाडी (पुरूष वय ५६), चोविसावाडी (पुरूष वय ९३), मोशी (पुरूष वय ६३), चिंचवड (पुरूष वय ७८), चिंचवड (पुरूष वय ६३), चऱ्होली (पुरूष वय ५२), चऱ्होली (पुरूष वय ६३), वाकड (पुरूष वय ७०), पिंपळे गुरव (पुरूष वय ६३), खेड (पुरूष वय ४६), खेड (पुरूष वय ६५)सुदुंबरे (पुरूष वय ४४), अहमदनगर (पुरूष वय ६०), मावळ (पुरूष वय ७५), सासवड (पुरूष वय ८२), चाकण (पुरूष वय ५४), चाकण (पुरूष वय ५५), खडकी (पुरूष वय ४०), मोशी (स्त्री वय ६४), दिघी (स्त्री वय ७५), दापोडी (स्त्री वय ६७), इंदापूर (स्त्री वय ५०) येथील रहिवासी आहेत.

loading image
go to top