
पिंपरी, ता. २ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला ऑगस्ट महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत १३ लाख प्रवाशांनी ॲप डाऊनलोड केले. प्रवाशांनी वर्षभरात ॲपद्वारे ७० कोटी ७१ लाख ४६हजार ४३६ रुपयांचे तिकीट आणि पास काढले आहेत. दिवसेंदिवस ॲपला प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसून येत असला तरी अजूनही ॲपद्वारे तिकीट आणि पास काढणाऱ्यांची संख्या सरासरी ८.३३ टक्के आहे.