ट्रकच्या चाकाखाली सापडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली.
accident news 15-year-old girl dead under truck wheel pimpri
accident news 15-year-old girl dead under truck wheel pimpriesakal

पिंपरी : रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली. तन्वी गव्हाणे (वय १५, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तन्वी ही निगडीला मावशीकडे आली होती. तन्वीचे नाक टोचन्यासाठी रविवारी (ता.१५) सकाळी तन्वी तिच्या मावशीसह सराफ दुकानात गेली होती. तेथून परतत असताना निगडी उड्डाणपुलाजवळील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यालगत थांबलेली तन्वी ट्रकच्या चाकाखाली सापडली. यामध्ये गँभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला . याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com