एमआयडीसी कंपनीतील अधिकाऱ्यावर हल्ला केलेले फरार आरोपी जेरबंद

ज्ञानेश्वर वाघमारे
Wednesday, 12 August 2020

मुथुय्या हे ३० तारखेला संध्याकाळी कंपनीतून घरी चालले असताना वडगाव येथील विशाल लॉन्स समोरील गतिरोधकाजवळ आरोपींनी त्यांच्या मोटारगाडीला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. काय झाले हे पाहण्यासाठी ते गाडी थांबवून बाहेर येत असताना दोन मोटारसायकलवरील चौघांनी त्यांच्या पायाच्या नडगीवर हॉकीस्टिकने हल्ला केला. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते.
 

वडगाव मावळ : तळेगाव एमआयडीसी मधील युएमडब्ल्यु डाॅन्गशिन कंपनीचे सिनियर जनरल मॅनजर मुथुय्या सुबय्या बडेदरा (वय ५७, रा. टाटा हौसिंग सोसायटी, वडगाव मावळ, मूळ रा.बंगलोर, कर्नाटक)यांच्यावर हल्ला करणाऱ्या चौघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती या विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. दीड लाख रुपयांची सुपारी घेऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे घनवट यांनी  सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

करणकुमार चल्ला मत्तु ( वय २३, रा. गांधीनगर, देहुरोड), बालाजी रमेश मुदलीयार (वय २७, रा.एम.बी. कॅम्प, देहूरोड), राकेश शिवराम पेरूमल(वय२५,  रा. एम.बी.कॅम्प, देहुरोड  अशी याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुस्ताक जमील शेख ( वय २५, रा. गांधीनगर, देहुरोड ) या चौथ्या आरोपीला कोरोना झाला असल्याने व तो उपचार घेत असल्याने त्याला ताब्यात घेणे बाकी आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुथुय्या हे ३० तारखेला संध्याकाळी कंपनीतून घरी चालले असताना वडगाव येथील विशाल लॉन्स समोरील गतिरोधकाजवळ आरोपींनी त्यांच्या मोटारगाडीला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. काय झाले हे पाहण्यासाठी ते गाडी थांबवून बाहेर येत असताना दोन मोटारसायकलवरील चौघांनी त्यांच्या पायाच्या नडगीवर हॉकीस्टिकने हल्ला केला. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते.

बडेदरा यांच्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता व त्याचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत होते. तसेच स्थानिक गुन्हे शाखा देखील समांतर तपास करत होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसेच तांत्रिक तपासातून माहिती घेऊन त्यांनी गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली. पोलिसांनी आरोपींकडे  सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आशिष ओव्हाळ (रा.विकास नगर, देहूरोड, पुणे) यांनी आम्हाला दीड लाखाची सुपारी देऊन त्याला त्रास देत असलेल्या बडेदरा यांना फॅक्चर करण्यास सांगितले होते.

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

 पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार विजय पाटील, प्रकाश वाघमारे, सचिन गायकवाड, गणेश महाडिक यांच्या पथकाने दहा-बारा दिवस फरार असलेल्या आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused absconding accused of attacking MIDC officer