आरोपीचा पोलिस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयात सोमवारी (ता. 31) सायंकाळी फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पिंपरी - पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयात सोमवारी (ता. 31) सायंकाळी फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमित माणिक छाजेड (रा. पोर्टर चाळ, देहूरोड) असे फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. देहूरोड मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी  छाजेडने उपोषण सुरू केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यापारी संघटनेकडून दोन लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी छाजेडवर देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. 28) खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

मावळात कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला दोन हजारांचा टप्पा

मात्र, आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप करत छाजेड हा सोमवारी सांयकाळी पोलीस आयुक्तालयात आला. विशेष शाखेच्या कार्यालयात जाऊन त्याने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावाधाव झाली. पोलिसांनी त्याला तातडीने पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused attempted suicide at Police Commissionerate