गोळीबारांतील आरोपींना जेरबंद केले असून कोणालाही सोडणार नाही - कृष्ण प्रकाश

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वारंवार घडत असलेल्या गोळीबाराच्या घटना गंभीर आहेत. याची गंभीर दाखल घेतली आहे.
krishna-prakash
krishna-prakashSakal
Summary

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वारंवार घडत असलेल्या गोळीबाराच्या घटना गंभीर आहेत. याची गंभीर दाखल घेतली आहे.

पिंपरी - पोलिस आयुक्तालयाच्या (Commissionerate of Police) हद्दीत वारंवार घडत असलेल्या गोळीबाराच्या (Firing) घटना गंभीर आहेत. याची गंभीर दाखल घेतली आहे. या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची कबुली खुद्द पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी दिली. दरम्यान, या घटनांमधील आरोपींना जेरबंद केले असून कोणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्तालयाच्या हद्दीत मागील महिनाभरात गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. खुलेआम भररस्त्यात गोळ्या झाडून तरुणांचा खून केल्याच्या घटना सांगवी, चाकण व आढले येथे घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याबाबत आयुक्त पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वारंवार घडत असलेल्या गोळीबाराच्या घटना गंभीर असून याची गंभीर दाखल घेतली आहे. या घटनांमधील आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) देखील कारवाई केली जाईल. आरोपी कोणीही असो त्यांना सोडणार नाही.

krishna-prakash
लष्कराच्या बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन भरती प्रकरणात दिल्ली मुख्यालयातील सहसंचालकाला अटक

दरम्यान, या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आपण तातडीने पावले उचलत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करीत असल्याचेही कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

या क्रमांकावर मिळेल मदत

नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोवीस तास काही सम्पर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. ११२, २७३५२५००, २७३५२६००, २६२०९१२२ या दूरद्वनी क्रमांकासह ९५२९६९१९६६, ९१३४४२४२४२ या क्रमांकावरही नागरिक संपर्क साधू शकतात. यामुळे नागरिकांना तातडीने मदत मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com